Murmura recipe | मुरमुरा चिवडा | spicy puffed rice | spicy murmura chivda with detailed video recipe. This simple and easy snack recipe has less calories and healthier option compared to other street food options and hence a perfect diet evening snack. Murmura chivda is an ideal snack recipe prepared especially during the festival season of Diwali and Ganapathi Chaturthi. having said that it is also a popular jar snack and can be prepared and served for the day-to-day with a cup of tea or coffee. Spicy murmura chivda is one such recipe which is an ideal and healthy evening snack enjoyed with a cup of masala tea.
साबुदाणा वडा हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. भिजवलेल्या साबुदाण्यात तिखट, मीठ,जीरे, शेंगदाणे चे कूट व इतर पदार्थ घालून तळलेले हे वडे उपवासाला सहसा चालतात. तळताना विशेष काळजी घ्यायची असते. छान खरपूस तळल्यावर काढून घेऊन चटनी बरोबर चविष्ट लागते.
साबुदाणा वडा बनविण्यासाठी लागणारे साहित्य.
—————————————-
• भिजवलेले साबुदाणे – 1 वाटी
• उकडलेले बटाटे – 1/2 वाटी
• कोथिंबीर
•लिंबाचा रस – 2 चमचे
• भाजलेले शेंगदाणे पावडर – 3 चमचे
• कापलेले नारळ – १/२ वाट्या
• हिरवी मिरची- 3
• जिरे- 1 चमचा
• मीठ चवीनुसार
•आले – 2 लहान तुकडे
• साखर – 1 चमचा
Steps
सर्वप्रथम एक चमचा भाजलेला जीरा, आळ्याचे 2 लहान तुकडे आणि 3 मिरची घेऊन मिक्सरला वाटून त्याचा बारीक कूट करून घ्यायचा आहे.
2) नंतर एक वाटी साबुदाणा घेऊन त्यात उकडलेला बटाटा कुस्करून घ्यायचं आहे. नंतर त्यात आधी वाटून घेतलेलं तिखट कूट मिक्स करून घ्यायचं आहे.
3) त्यानंतर 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, चविप्रमाणे मीठ आणि 1 चमचा साखर घ्यायची आहे
4) 2 चमचे लिंबाचा रस घ्यायचं आहे. आता हे सर्व मिश्रण चपातीचा पीठ मळतो तसा मळून घ्यायचा आहे. चांगल मळून झालं की हाताला थोडंसं पाणी लावून गोल वडे मळून घ्यायचे आहेत.
5) गोल असा वडा मळून झाला की त्याला मधून बोटाने छिद्र पाडून घ्यायचं आहे. मध्यभागी छिद्र पाडून घेतल्याने वड्याचा मधला भाग देखील व्यवस्थित तळला जातो, ज्याने वडे खूप कुरकुरीत होतात.
6) आता तेल गरम करुन मध्यम आचेवर वडे तळून घ्यायचे आहेत. कढईत जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्या, जेणेकरून वडे फुटणार नाहीत. छान सोनेरी छटा येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. छान असे वडे तळून झाल्यावर चटणी सोबत खायला खूप छान लागतात.
Watch video recipe on Shweta’s kitchen Marathi Youtube Channel